Corruption in teacher recruitment scam : शिक्षण विभाग नागपूर येथे गाजत असलेल्या शिक्षक भरती घोटाळा प्रकरणाची व्याप्ती संपूर्ण राज्यात पसरली आहे. या शिक्षक भरती घोटाळ्याची अमरावती विभागासह संपूर्ण राज्यात एसआयटी मार्फत चौकशी करावी. तसेच विदर्भातील शिक्षण विभागात रिक्त असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे तात्काळ भरावी, या प्रमुख मागणीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने अमरावती व नागपूर उपसंचालक कार्यालय समोर शुक्रवार २७ जून रोजी धरणे देण्यात येणार आहे.
अमरावती : शिक्षण विभाग नागपूर येथे गाजत असलेल्या शिक्षक भरती घोटाळा प्रकरणाची व्याप्ती संपूर्ण राज्यात पसरली आहे. या शिक्षक भरती घोटाळ्याची अमरावती विभागासह संपूर्ण राज्यात एसआयटी मार्फत चौकशी करावी. तसेच विदर्भातील शिक्षण विभागात रिक्त असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे तात्काळ भरावी, या प्रमुख मागणीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने अमरावती व नागपूर उपसंचालक कार्यालय समोर शुक्रवार २७ जून रोजी धरणे देण्यात येणार आहे.
अमरावती येथे होणाऱ्या आंदोलनामध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले, माजी शिक्षक आमदार तथा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे सरचिटणीस व्ही.यू. डायगव्हाणे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतिक अध्यक्ष अरविंद देशमुख उपाध्यक्ष जयदीप सोनखासकर, विजय ठोकळ, विभागीय कार्यवाहू बाळासाहेब गोटे, माजी अध्यक्ष श्रावण सिंग बरडे, राम बारोटे, माजी विभागीय कार्यवाह मुरलीधर धनरे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राथमिक- माध्यमिक- उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून व शिक्षण विभागातील या भ्रष्टाचाराविरुद्ध संघटनेचा आवाज बळकट करावा, असे आव्हान विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष पवन बन कार्यवाह रामकृष्ण जीवतोडे कार्याध्यक्ष विजय खरोडे ,आनंद मेश्राम, मनोज जिरापूरे, उपाध्यक्ष श्रावणसिंग वडते, साहेबराव धात्रक, श्याम बोडे ,मंगला वडतकर ,संजय पुरी, श्रीकांत अंदुरकर ,गणेश धर्माळे, उमाकांत राठोड ,विठ्ठल परांडे, गुलाब सोनोणे, सौ.संध्या जीरापुरे ,दिवाकर नरुले ,महेश अंदुरे, उमेश डोंगरे, गंगाधर गेडाम ,भूपेंद्र देरकर ,संतोष हेडाऊ, अरुण गारघाटे ,गजेंद्र काकडे, पंकज राठोड, वैशाली चौधरी, विलास वाघमारे व इतर कार्यकारणी सदस्यांनी केले आहे.