छत्रपती संभाजीनगर : लोकाभिमुख सेवांसाठी प्रसार माध्यमे आणि प्रशासन यांच्यात समन्वय आवश्यक आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी बुधवार, 16 जुलै रोजी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

छत्रपती संभाजीनगर : लोकाभिमुख सेवांसाठी प्रसार माध्यमे आणि प्रशासन यांच्यात समन्वय आवश्यक आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी बुधवार, 16 जुलै रोजी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, छत्रपती संभाजीनगर विभागाचे अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष डॉ.माधव सावरगावे, महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या पत्रकारिता विभाग प्रमुख डॉ.रेखा शेळके, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, दीपक रंगारी, जिल्हा सुचना विज्ञान केंद्राचे शेळके, प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करुन कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. विभागीय आयुक्त पापळकर पुढे म्हणाले की, बदललेल्या काळानुसार बातमीचे स्वरूप ही बदलले आहे. ज्याप्रमाणे वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दाखवल्या जाणाऱ्या बातम्या तसेच समाज माध्यमावर प्रदर्शित होणाऱ्या बातम्या यामधील फरक लक्षात घेता वृत्तपत्रातील बातम्यांमध्ये वस्तुस्थिती अधिक प्रमाणात मांडलेली दिसते. ही बाब कोणत्याही विषयाची पार्श्वभूमी समजण्यासाठी साह्यभूत ठरते. पत्रकार प्रशासनातील चुका निदर्शनास आणून देण्याचे काम करतात. बदललेले तंत्रज्ञान शासन लोकाभिमुख करण्यासाठी येणाऱ्या आवश्यक आहे. पत्रकारांनाही कायद्याचे ज्ञान, भाषेचा योग्य वापर या बद्दल ज्ञान आवश्यक आहे. समाजामध्ये सोहर्दपूर्ण वातावरण तयार करून संपर्क आणि संवादाच्या माध्यमातून प्रशासन आणि पत्रकारिता यांनी समन्वयाने काम केल्यास समाजाच्या विकासात गतिमानता येईल असेही पापळकर यांनी सांगितले.
याप्रसंगी छत्रपती संभाजीनगर विभागाचे अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष डॉ.माधव सावरगावे, महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या पत्रकारिता विभाग प्रमुख डॉ.रेखा शेळके, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, जिल्हा सुचना विज्ञान केंद्राचे शरद दिवेकर, प्रा. दीपक रंगारी यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रभू गोरे यांनी केले. तर प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी मानले.
