Lok Sabha Elections: काँग्रेसने ५० वर्ष केवळ गरिबी हटावचे नारे दिले : नरेंद्र मोदींचे टीकास्त्र

नरेंद्र मोदी

Lok Sabha Elections : एनडीएचा मुद्दा विकास, सुरक्षा, सन्मान आणि स्वाभिमान आहे. मात्र काँग्रेस यामधील कोणत्याही मुद्द्यावर बोलत नाही. काँग्रेसने 50 वर्ष केवळ गरिबी हटावचे नारे दिलेत. स्वतःच्या वोट बँकेला खुश करण्यासाठी ते हा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करून चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स झाली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर केली आहे.

नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी

अहमदनगर : एनडीएचा मुद्दा विकास, सुरक्षा, सन्मान आणि स्वाभिमान आहे. मात्र काँग्रेस यामधील कोणत्याही मुद्द्यावर बोलत नाही. काँग्रेसने 50 वर्ष केवळ गरिबी हटावचे नारे दिलेत. स्वतःच्या वोट बँकेला खुश करण्यासाठी ते हा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करून चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स झाली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर केली आहे. तसेच त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 7 मे रोजी अहिल्यानगरमध्ये (अहमदनगर) जाहीर सभा झाली. या सभेत ते बोलत होते. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ महायुतीची सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासात अहमदनगर जिल्हा दिशा देणारा आहे. विखे पाटील यांचे मोठे योगदान आहे. आज याची मला आठवण येत आहे. आज तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. भाजपा आणि एनडीएला भरपूर जन समर्थन मिळाले आहे. चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स झाली. निवडणुकीआधी भानुमतीचा कुलाबा झाला होता तो मातीच्या किल्ल्यासारखा ढासळणार आहे. भारतीयांना संतुष्ट करण्याची ही निवडणूक आहे. इंडिया आघाडी आपल्याच लोकांच्या तूष्टीकरणांमध्ये लागली आहे, असा हल्लाबोल मोदींनी यावेळी केला.

काँग्रेस नेते दहशतवादी कसाबची बाजू मांडताहेत: मोदी

मुंबईमध्ये झालेला 26/11 चा हल्ला पाकिस्तान ने केलेला हल्ला होता. आपल्या जवानांना दहशतवाद्यांनी शहीद केले होते. आपल्या निर्दोष नागरिकांची हत्या दहशतवाद्यांनी केली होती. हे सर्व जगाला माहिती आहे. न्यायालयाने देखील या विषयावर निर्णय दिला आहे. इतकच नाही तर पाकिस्तानने देखील दहशतवादी हल्ला झाल्याचे मान्य केले आहे. या दहशतवाद्यांचे फोन रेकॉर्ड उपलब्ध आहेत. असे असताना काँग्रेस पक्षाचे नेते आता दहशतवाद्यांना निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र जाहीर करत आहेत. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्या संदर्भात काँग्रेसच्या नेत्यांचे वक्तव्य अतिशय धोकादायक असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आता काँग्रेस पक्षातील नेते आतंकी कसाबची बाजू मांडत असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »