घरगुती गॅसचा व्यवसायात वापर; कारंज्यात तीन ठिकाणी सिलिंडर जप्त: 26 ठिकाणी तहसील पथकाची धडक तपासणी 

कारंजा : शहरामध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा अवैधरीत्या व्यावसायिक वापर होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर तहसील कार्यालयाच्या पथकाने अचानक छापे टाकून धडक कारवाई केली. या कारवाईत शहरातील हॉटेल, चहा-नाश्त्याच्या दुकानांसह एकूण 26 ठिकाणी तपासणी करण्यात आली.

या तपासणीदरम्यान काही ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कामांसाठी होत असल्याचे आढळून आले. त्यानुसार प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधितांकडील सिलिंडर जप्त केले.

छाप्यामध्ये  काही ठिकाणी अनियमितता आढळून आली.

हॉटेल अखंड अमृततुल्य, मानोरा रोड, चहा आणि मी, झाशी राणी चौक, कुटुंब हॉटेल, मंगरूळपीर रोड,

या तिन्ही ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होत असल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधितांकडील सिलिंडर जप्त करण्यात आले.

ही कारवाई मा. तहसीलदार रवी महाले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईदरम्यान स्मिता नायगावकर (निरीक्षण अधिकारी, कारंजा), महेश धानोरकर (मंडळ अधिकारी), अर्चना चिकटे (ग्राम महसूल अधिकारी), राहुल वारघट (ग्राम महसूल अधिकारी), सागर राऊत व तुषार श्रीरामे यांनी सहभाग घेतला.

प्रशासनाकडून सांगण्यात आले की, घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर करणे नियमबाह्य असून अशा प्रकारांवर पुढेही अचानक तपासण्या व कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनीही अशा प्रकारांची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »