बुलढाणा : जिल्ह्यातील शेतरस्ते, गावसीमा रस्ते, गावाला जोडणारे रस्ते मोकळे करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

गाव खेड्यांना जोडणारे रस्ते ग्रामीण भागातील धामण्या समजल्या जातात. परंतु याच धमन्यांची अवस्था अतिशय बिकट झाल्याने गाव खेड्यात शेती करणे कठीण झाले आहे. गावातील समस्या, रुग्णालय, शाळकरी विद्यार्थी यांच्यासाठी गाव खेड्यातील रस्ते हे महत्त्वाचे ठरतात. परंतु गावातील शेत रस्ते, पांदण रस्ते गाव सीमेला जोडणारे रस्ते, गाव जोडणारे रस्ते हे मोकळे व्हायला पाहिजे आणि ग्रामीण भागातील समस्याचे निराकरण होण्यासाठी गाव खेड्यातील नागरिकांना सुविधा पोहोचण्यासाठी रस्ते महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे हे रस्ते मोकळे करण्यात यावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे जिल्हा दौऱ्यावर आले असता तुकाराम अंभोरे यांनी प्रत्यक्ष त्यांच्याकडे मागणी केली. यासंदर्भात तत्पर असून जिल्हाधिकाऱ्यांना व पोलिस अधीक्षकांना स्वतःहून कारवाई करण्याचे आदेश देणार असल्याचे यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.