न्यायालय परिसरात दोन गटांत राडा: दगडफेक, पोलिसांच्या गाडीवर महिलांनी फेकल्या चपला!

भोकरदन : मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास न्यायालय परिसरात दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून सुरू झालेल्या या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले, यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. संतप्त जमावाने रोडवर दगडफेक केल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या दोन गटांमध्ये ही घटना घडल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

 वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक सुरू झाली. जमावाला पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने भोकरदन पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता, तर सुनावणी नंतर अज्ञात आरोपीला पोलीस वाहनातून पुढील कार्यवाही करता हलविण्यात येत असतांना संतप्त जमावातील काही महिलांनी व पुरुषांनी  पोलिसांच्या गाडीवर चप्पलफेक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.  यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावाला पांगवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

या विषयी मिळालेल्या माहिती नुसार तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाण्यात एका आरोपीवर  गुन्हे दाखल होते. आरोपीला हसनाबाद पोलिसांनी ताब्यात घेत आज दुपारी भोकरदन न्यायालयात हजर केले होते. दरम्यान या घटनेला पारिवारिक वळण मिळून दोन गटात जुन्या वादातून राडा झाला.

 याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »