dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

वडिलांच्या अंत्यविधीसाठी दुबईहून मुलांचा प्रवास; एकाच कुटुंबातील तीन ज्येष्ठ नागरिकांचे निधन 

भोकरदन :  शहरातील सराफा मार्केट परिसरात वास्तव्यास असलेल्या चाऊस कुटुंबातील तीन ज्येष्ठ नागरिकांचे निधन झाले. अवघ्या दोन आठवड्यात कुटुंबातील तिघांचे निधन झाल्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

       शहरतील सिल्लोड मार्गावरील रहिवाशी मोहम्मद मुबारक बिनक्रेशान (५७) यांचे २० मे रोजी सायंकाळी निधन झाले. मुबारक चाऊस यांचे दोन मुले दुबईमधील सौदीत व्यवसाय करतात.  त्यांनी विमानाने पाच तासात मुंबई गाठली. तेथून भोकरदन येथे आले. मुबारक चाऊस यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.  आठवडा उलटताच फाहद अमर अमौदी याहीया चाऊस ( ४८ ) यांचे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली असा परिवार आहे. दोन आठवडे उलटले असतानाच परिवारातील मोहम्मद बिन सालेह अलजीश चाऊस ( ५५ ) यांचे शुक्रवार, 6 जून रोजी रात्री दहा वाजेदरम्यान निधन  झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top