Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरातील नागरिकांना ८-१० दिवसांनी पाणी मिळत असल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस पक्षाने सोमवार 24 जून रोजी मनपा कार्यालयासमोर हंडा घेऊन जोरदार आंदोलन केले.
छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरातील नागरिकांना ८-१० दिवसांनी पाणी मिळत असल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस पक्षाने सोमवार 24 जून रोजी मनपा कार्यालयासमोर हंडा घेऊन जोरदार आंदोलन केले.
सकाळीच काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मनपा कार्यालयासमोर जमले होते. त्यांनी “पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे” आणि “मनपा प्रशासन हाय हाय” अशा जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला. नागरिकांना दररोज पाणी मिळावे किंवा किमान एक दिवसाआड पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी त्यांची मागणी होती. काँग्रेस नेते म्हणाले की, “शहरातील पाणीपुरवठा अत्यंत अनियमित झाला आहे. ८ ते १० दिवसांनी पाणी येणे हे अत्यंत अन्यायकारक आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू.”
या आंदोलनामुळे प्रशासनाचीही चांगलीच भांबेरी उडाली. मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि त्यांना आश्वासन दिले की, “शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या लवकरात लवकर सोडवली जाईल. नागरिकांना एक दिवसाआड पाणी मिळावे यासाठी योग्य त्या सर्व उपाययोजना केल्या जातील.”
शहरातील नागरिक आता प्रशासनाच्या वचनांची पूर्तता होण्याची प्रतीक्षा करत आहेत. या आंदोलनामुळे शहरातील पाणी प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. प्रशासनावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी दबाव वाढला आहे.