Chhatrapati Sambhajinagar: परळीतील गोळीबारी प्रकरणाचा उलगडा; गितेंसह पाच जणांवर गुन्हा

Vairagarh Crime News

Chhatrapati Sambhajinagar: काही केल्या बीडमधील राजकारण शांत होताना दिसत नसतानाच याच बीड जिल्ह्यातील परळीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मरळवाडी येथील सरपंचाच्या खून प्रकरणाचा उलगडा झाला असून, पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime
Crime

छत्रपती संभाजीनगर : काही केल्या बीडमधील राजकारण शांत होताना दिसत नसतानाच याच बीड जिल्ह्यातील परळीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मरळवाडी येथील सरपंचाच्या खून प्रकरणाचा उलगडा झाला असून, पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मरळवाडीचे सरपंच आंधळे यांच्या खुनाचा उलगडा झाला असून, या प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळीमध्ये शनिवार 29 जून रोजी रात्री झालेल्या गोळीबारामध्ये एक जण जागीच ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले होते. परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा हा थरार घडला होता. या गोळीबारामध्ये मरळवाडीचे सरपंच आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर नंदागौळ येथील ग्यानबा मारोती गिते जखमी आणि महादेव गीते हे दोघे गोळीबारात गंभीर जखमी झाले होते. जखमींवर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »