Chhatrapati Sambhajinagar ‘Sweep’ Voter Awareness Program: लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व मतदानाच्या अधिकारात : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Chhatrapati Sambhajinagar 'Sweep' Voter Awareness Program:

Chhatrapati Sambhajinagar ‘Sweep’ Voter Awareness Program:  लोकशाही व्यवस्था ही जगातील सर्वोत्कृष्ट व्यवस्था आहे. आपल्याला मिळणाऱ्या विविध सोई, सुविधा आपले शिक्षण, रोजगार प्राप्त करण्याचा हक्क लोकशाहीमुळे व त्यात दिलेल्या मतदानाच्या अधिकारात आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गुरुवार, 24 ऑक्टोबर रोजी केले.

Chhatrapati Sambhajinagar 'Sweep' Voter Awareness Program:
छत्रपती संभाजीनगर :  लोकशाही व्यवस्था ही जगातील सर्वोत्कृष्ट व्यवस्था आहे. आपल्याला मिळणाऱ्या विविध सोई, सुविधा आपले शिक्षण, रोजगार प्राप्त करण्याचा हक्क लोकशाहीमुळे व त्यात दिलेल्या मतदानाच्या अधिकारात आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गुरुवार, 24 ऑक्टोबर रोजी केले.  येथील शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात मतदार जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्वीप नोडल अधिकारी अंकुश पांढरे, सहा. नोडल अधिकारी स्वप्निल सरदार, प्राचार्य रोहिणी कुलकर्णी, प्रा. भगवान कांबळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, विद्यार्थी जिवनात विद्यार्जन करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. तसेच लोकशाहीचे संवर्धन आणि जतन करणे हे सुद्धा आपले आद्यकर्तव्य आहे. त्यासाठी युवकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून मतदान करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यंनी आपल्या भवतालच्या सार्वजनिक प्रश्नात लक्ष घालून पर्यावरण रक्षण, प्रदूषण नियंत्रण, वृक्षरोपण अशा विविध विषयांत विद्यार्थ्यांनी कार्यरत असणे आवश्यक आहे,असे जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आपल्या आई वडील, गुरुजनांचा आदर करणे, सुसंस्कारित होणे यासारख्या बाबी ह्या व्यक्तिमत्व विकासाला पूरक असतात. या संस्कारांपासून दुर जाणाऱ्या पिढीला संस्कारक्षम बनवून देश, राज्य आणि समाजाभिमुख युवक घडविणे हे आजच्या शिक्षक आणि पालकांचे उद्दिष्ट असायला हवे. समाजात विद्यार्थी आत्महत्या, गर्भलिंगनिदान आणि कन्या भ्रूण हत्या, व्यसनाधिनता अशा विविध समस्यांमागे संस्कारहिनता हे कारण आहे. आजचा समाज शिक्षित झाला आहे तितका तो सुसंस्कारित झालेला नाही. त्यासाठी महाविद्यालयातील शिक्षकांनी व पालकांनी सतर्क रहायला हवे,असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक स्वप्निल सरदार यांनी केले तर उपायुक्त अंकुश पांढरे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य रोहिणी कुलकर्णी यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »