Chhatrapati Sambhajinagar News: पोलिस आयुक्तालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Chhatrapati Sambhajinagar News: पोलिस आयुक्तालय परिसरात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या इमारतीवर चढुन एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवार, 8 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. 

छत्रपती संभाजीनगर : पोलिस आयुक्तालय परिसरात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या इमारतीवर चढुन एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवार, 8 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. परंतु सतर्क असलेल्या आजूबाजूच्या नागरिकांनी आरडा-ओरड केल्यानंतर आत्महत्या करण्यास इमारतीवर चढलेल्या तरुणाला वाचविण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत बाबूराव वनारसी (32), रा. मुकुंदवाडी परिसर असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पोलिस आयुक्तालय परिसरात असलेल्या एका इमारतीवर भरत वनारसी चढला होता. हा प्रकार काही महिलांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडा ओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी रेहान अनीस बेग यांनी इमारतीवर धाव घेत काही तरुणांच्या मदतीने भरत वनारसी याला सहीसलामत वाचवून बेगमपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे पोलिस आयुक्तालय परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »