Chhatrapati Sambhajinagar Heat and Run: मद्यधुंद तरुणांने सुसाट कार चालवत वाहनांना उडवले

अपघातानंतर चुराळा झालेल्या दुचाकी

Chhatrapati Sambhajinagar Heat and Run : शहरातील शिवाजीनगर भागात मद्यधुंद तरुणांनी बेफाम कार चालवत धुमाकूळ घातला. भरधाव आणि अनियंत्रित या कारने रस्त्यालगत उभ्या चार दुचाकींचा अक्षरशः चुराडा केला. तर एका दुकानासमोर असलेले सहा टेबल व घराच्या ओट्यालाही या कारने धडक देत तोडून टाकले. शनिवार ८ जून रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शिवाजीनगर परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, कारचालकासह कारमधील मद्यधुंद चार तरुणांनी कारच्या नंबर प्लेट काढून टाकत पोबारा केला.

अपघातानंतर चुराळा झालेल्या दुचाकी
अपघातानंतर चुराळा झालेल्या दुचाकी

छत्रपती संभाजीनगर :  पुणे पोर्षे कार अपघाताचे प्रकरण ताजे असताना शहरातील शिवाजीनगर भागात मद्यधुंद तरुणांनी बेफाम कार चालवत धुमाकूळ घातला. भरधाव आणि अनियंत्रित या कारने रस्त्यालगत उभ्या चार दुचाकींचा अक्षरशः चुराडा केला. तर एका दुकानासमोर असलेले सहा टेबल व घराच्या ओट्यालाही या कारने धडक देत तोडून टाकले. शनिवार ८ जून रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शिवाजीनगर परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, कारचालकासह कारमधील मद्यधुंद चार तरुणांनी कारच्या नंबर प्लेट काढून टाकत पोबारा केला.
शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनकडून एक पांढऱ्या रंगाची कार क्रमांक (एमएच- २०- बी- वाय- ९१३६) वेगाने शिवाजीनगरकडे आली. या कारने एका चारचाकी वाहनाला धडक दिली. यानंतर कार चालकाने प्रगती हार्डवेअर या दुकानासमोर साखळीने बांधून ठेवलेल्या टेबल आणि ग्रीलला जोराची धडक दिली. पुढे या कारचालकाने रोहिणी एमोरियम समोरील ३ मोपेड आणि एका दुचाकीला धडक देत चुराडा केला. बेफाम झालेल्या कार चालकाने संचिता जेवलर्सच्या ओट्याला आणि खांबाला धडक देत दिली. या अपघाताच्या आवाजाने नागरिक घराबाहेर आले. कार बंद पडल्याने कारमधील चालक आणि तरुणांनी कारच्या दोन्ही बाजूच्या नंबर प्लेट तोडून पोबारा केला.

सुदैवाने जीवितहानी टळली

कारचा चालक नशेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. इतरही तीन तरुण कारमध्ये होते. या भरधाव वेगात आणि अनियंत्रित कार चालकाने जवळपास एक किलोमीटर अंतर कापले. सुदैवाने या दरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारमधील तरुण नशेत असल्याने जमावही संतप्त झाला होता.

कारचा मालक ताब्यात

कार चालकासह इतर तरुण अपघातानंतर पसार झाले. घटनास्थळी जमलेल्या जमावाने शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी जात जमावाला शांत केले. पुंडलिक नगर पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या कारच्या मालकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पुंडलिक नगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक यादव यांनी दिली. फरार झालेल्या आरोपींचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »