Chhatrapati Sambhajinagar : डॉ. किरण काळे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित 

Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : “शाश्वत आणि सर्वसामावेशक शहरी विकास आणि सामाजिक चळवळ” या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत डॉ. किरण काळे यांना भारतत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Chhatrapati Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर  :  नवलभाऊ प्रतिष्ठान संचालित रुख्मिणीताई कला आणि वाणिज्य महिला महाविद्यालय अंमळनेर येथे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई आणि ऑल इंडिया ह्युमन राईट असोसिएशन,नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.२७) “शाश्वत आणि सर्वसामावेशक शहरी विकास आणि सामाजिक चळवळ” या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत डॉ. किरण काळे यांना भारतत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या राष्ट्रीय परिषदेत शैक्षणिक,वैज्ञानिक आणि संस्कृतीक अश्या विविध गुणांचा आदर्श घेत राष्ट्रासाठी,शिक्षण क्षेत्रात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष योगदान देत असलेल्या डॉ. किरण काळे यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी श्याम पवार,प्रशासकीय अधिकारी डी. बी. पाटील,नवलभाऊ प्रतिष्ठानचे मानद संचालक सुनील गरुड,प्राचार्य डॉ. एस. जे. शेख, आॅल इंडिया ह्यूमन राईट असोसिएशनचे प्रमोद पाटील,प्रा. डॉ. युवराज मानकर,प्रा. डॉ. किरण काळे,प्रा. सुनील वाघमारे आदि उपस्थित होते. या परिषदेत मोठया संख्येने संशोधक, प्राध्यापक आणि सर्व विषयांचे अभ्यासक मंडळी सहभागी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »