Chhatrapati Sambhajinagar constituency counting: छत्रपती संभाजीनगर जिल्हृयातील नऊ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवार, 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेपासून सुरु झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल आठ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार दुपारी 1 वाजेपर्यंत आघाडीवर आहेत.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हृयातील नऊ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवार, 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेपासून सुरु झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल आठ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार दुपारी 1 वाजेपर्यंत आघाडीवर आहेत. तर औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे विदयमान आमदार यांच्यावर मात करीत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे. इम्तियाज जलील यांना 73 हजार 888 मते मिळाली असून अतूल सावे यांना 38 हजार 212 मते मिळाली आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्हृयातील नऊ विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. शनिवारी सकाळी मतमोजणीस पोस्टल मतांनी सुरुवात झाली. पोस्टल मताच्या पहिल्या फेरीपासूनच जिल्हृयातील सर्व मतदारसंघात शिवसेना (शिंदेगट) आणि भाजपच्या उमेदवारांनी मतांची आघाडी घेतली होती. गंगापूर विधानसभा मतदारसंघात आ. प्रशांत बंब यांनी 19 व्या फेरीअखेर 6 हजार 709 मतांची आघाडी घेतली. तर पैठण विधानसभा मतदारसंघात विलास भुमरे यांनी 22 हजार 603 मतांची आघाडी घेतली होती. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात आमदार संजय शिरसाठ यांना 65 हजार 843 मते मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांना 54 हजार 536 मते मिळाली. फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांच्यावर 23 हजार 706 मतांची आघाडी घेतली होती. कन्नड विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार संजय जाधव ह्या 12 हजार 954 मतांनी आघाडीवर आहेत. सिल्लोड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांच्यावर 7 हजार 976 मतांची आघाडी घेतली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना मतदारांनी नाकारले असल्याचे चित्र दिसून आले.