Chatrapati Sambhajimagar Crime : नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या गोळयांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन जणांना सिटीचौक पेालिसांनी सापळा रचून शिताफीने जेरबंद केले. पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून नशेच्या गोळयांचा साठा, एक दुचाकी, दोन मोबाईल असा एकूण 58 हजार 492 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
छत्रपती संभाजीनगर : नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या गोळयांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन जणांना सिटीचौक पेालिसांनी सापळा रचून शिताफीने जेरबंद केले. पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून नशेच्या गोळयांचा साठा, एक दुचाकी, दोन मोबाईल असा एकूण 58 हजार 492 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती सिटीचौक पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी शनिवार, 26 ऑक्टोबर रोजी दिली.
शेख सददाम शेख शरिफोददीन, सय्यद मोहम्मद आरेफ सय्यद मोहम्मद जावेद, दोघे, रा. छत्रपती संभाजीनगर शहर अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या नशेच्या गोळया विक्री करण्यासाठी आलेल्यांची नावे आहेत. लोटाकारंजा परिसरातील रोहिला गल्ली येथे दोन जण नशेच्या गोळया विकण्यासाठी येणार असल्याची माहिती सिटीचौक पोलिसांना शुक्रवार, 25 ऑक्टोबर रोजी मिळाली होती. पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलिस आयुक्त संपत शिंदे, सिटीचौक पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी, सहाय्यक निरीक्षक मनिषा हिवराळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्जुन कदम, पेालिस अंमलदार राजेंद्र साळूंके, मिसाळ, बबन इप्पर, आनंद वाहुळ, टेकले, घोडके, त्रिभूवन, गोलवाल आदींच्या पथकाने सापळा रचून नशेच्या गोळया विक्री करण्यासाठी आलेल्या शेख सददाम शेख शरिफोददीन, सय्यद मोहम्मद आरेफ सय्यद मोहम्मद जावेद या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून नशेच्या गोळयांचा साठा, दुचाकी क्रमांक (एमएच-20-एफझेड-3073), दोन मोबाईल असा एकूण 58 हजार 492 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी दोघांविरुध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.