शेतकऱ्यांच्या कर्जमाफिसाठी जालना येथे चक्काजाम आंदोलन: या रमी सरकारचे करायचे काय..?; रस्त्यावरच मांडला रमीचा डाव

जालना :  शेतकऱ्यांप्रति असंवेदनशील असलेल्या सरकारमधील कृषिमंत्री चक्क विधिमंडळाच्या सभगृहात रमी सर्कलवर पत्ते खेळतात. अशा रमी मास्टर कृषिमंत्र्यांचा सरकारने तत्काळ राजीनामा घ्यावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, या मागणीसाठी गुरूवार, 24 जुलै रोजी सकाळी 10 : 30 ते 12 वाजेपर्यंत जालना – छञपती संभाजीनगर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 

जालना :  शेतकऱ्यांप्रति असंवेदनशील असलेल्या सरकारमधील कृषिमंत्री चक्क विधिमंडळाच्या सभगृहात रमी सर्कलवर पत्ते खेळतात. अशा रमी मास्टर कृषिमंत्र्यांचा सरकारने तत्काळ राजीनामा घ्यावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, या मागणीसाठी गुरूवार, 24 जुलै रोजी सकाळी 10 : 30 ते 12 वाजेपर्यंत जालना – छञपती संभाजीनगर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 

     प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी कर्ज माफीसाठी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार जालना शहरातील छञपती संभाजीनगर महामार्गावर चौफुलीवर प्रहार संघटनेच्या व इतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी 10 : 30 वाजता चक्काजाम  आंदोलन सुरू केले. यावेळी आंदोलक रस्त्यावर बसले आणि सभागृहात पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पत्यांचे डाव मांडून जोरदार घोषणाबाजी केली. ” या रमी सरकारचे करायचे काय…”, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी आंदोलकांनी पत्त्यांचे बंडले रस्त्यावर उधळून ‘रमी सर्कल पे आओ ना महाराज’ असे म्हणून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध केला. सरकारने कृषिमंत्री कोकाटे यांना पदावरून हटवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. चक्काजाम आंदोलनामुळे छञपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, बुलढाणा, सिल्लोड, जळगाव, अंबड, बीडकडून येणारी वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झालेली होती. काही आंदोलकांनी टायर जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच आंदोलकांना आवर घालून आंदोलकांना थांबवले. या आंदोलनात दिव्यांग बांधवांचा मोठा सहभाग होता. महिला आंदोलक देखील यावेळी उपस्थित होत्या. 

 ‘आओ ना महाराज..’

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे सोडून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे रमी सर्कलवर पत्ते खेळत बसले होते. हे सर्व महाराष्ट्राने पाहिले. त्यामुळे आंदोलकांनी चक्काजाम आंदोलनात चक्क प्रतिकात्मक पत्त्यांचे डाव मांडले आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह सरकारला उद्देशून ‘ रमी सर्कल पे आओ ना महाराज’ असे म्हणत सरकारचा निषेध नोंदवला.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »