छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसमधील आक्रमक ओबीसी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच आज छत्रपती संभाजीनगर येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. क्रांती चौक येथे भुजबळ समर्थक मनोज घोडके यांच्या नेतृत्वात फटाक्यांची आतषबाजी करीत एकमेकांना पेढे भरवण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसमधील आक्रमक ओबीसी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच आज छत्रपती संभाजीनगर येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. क्रांती चौक येथे भुजबळ समर्थक मनोज घोडके यांच्या नेतृत्वात फटाक्यांची आतषबाजी करीत एकमेकांना पेढे भरवण्यात आले.
विधानसभा निडणक झाल्यानंतर अस्तीत्वात आलेल्या राज्य सरकारमध्ये जेष्ठ आमदार म्हणून ओबीसी नेते छगन भुजबळ यांना महत्वाचे मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना काही कारणास्तव बाहेर राहावे लागले. राज्यातील त्यांच्या समर्थकांचा यामुळे हिमोड झाला मात्र भुजबळ आपल्या चाहत्यांच्या कायम संपर्कात होते. अखेर सहा महिन्यानंतर भुजबळ समर्थकांना जल्लोष करण्याची संधी मिळाली. मुंबईत ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच ईकडे शहरात भुजबळ यांचे कट्टर समर्थक मनोज घोडके यांच्या नेतृत्वात क्रांती चौक येथे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी आप्पासाहेब निर्मळ, शहर कार्याध्यक्ष कयूम शेख, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष विलास ढंगारे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष भाग्यश्री राजपूत, एल.एम.पवार, आनंदा ढोके, सुरेश बनसोड, जिल्हा समन्वयक निशांत पवार, समता परिषद शहराध्यक्ष गणेश काळे, शहर कार्याध्यक्ष चंद्रकांत पेहरकर, अर्जुन सोनवणे, लक्ष्मण हेकडे, जयवंत गायकवाड, जयराम साळुंखे, विष्णु वखरे, संजीवनराव घोडके, योगेश हेकाडे, बाळू सोनवणे, ॲड. महादेव आंधळे, सुरेश आगलावे, भारत श्रीखंडे, लक्ष्मण हेकाडे, योगेश घोडके, योगेश हेकाडे, सोहम चोपडे, कचरू वेळंजकर, यश घोडके, विराज घोडके, गणेश हिवाळे, नागेश भालेराव, काशीनाथ जाधव, संदीप राज हिंगे, ज्ञानेश्वर जेजुरकर, सदा पवार, सावता शिंदे, रियाश, अरूण जाधव, प्रकाश श्रीखंडे, सुभद्रा जाधव, अरुणा तिडके, राजश्री सत्वधर, समाधान बोडरे, संजय आढाव, कैलास रावळे, संतोष शिंदे, राहुल निकम, सोपान दारवंटे, गणेश शेवाळे, पंडित सत्वधर, रंजना गायके, राजश्री सत्वधर, रंजना कराळे, शारदाताई कोथंबिरे, रोहिणी काळे, अरुणा तिडके, चंद्रकला पाथरे, सावित्री शक्ती पिठाच्या सुनिता शिंदे, कांचन गादीकर, ॲड. राजेंद्र दारवंटे, गोपाळ भड, योगेश अंबेकर, रवि ढंगारे आदींची उपस्थिती होती.