Cannabis farming in Jalgaon Jamod : तालुक्यातील भिंगारा या जंगल भागातील वनविभागाच्या ई-क्लास जमिनीमध्ये लावण्यात आलेल्या गांजाची शेती जळगाव जामोद पोलिसांनी उघडकीस आणली. यावेळी पोलिसांनी दोन एकरातील तब्बल दोन ते अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव जामोद : तालुक्यातील भिंगारा या जंगल भागातील वनविभागाच्या ई-क्लास जमिनीमध्ये लावण्यात आलेल्या गांजाची शेती जळगाव जामोद पोलिसांनी उघडकीस आणली. यावेळी पोलिसांनी दोन एकरातील तब्बल दोन ते अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव जामोद पोलिसांना खबऱ्याकडून गुप्त माहिती मिळाली कि, जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा या आदिवासी पट्ट्यातील पहाडी भागामध्ये एका दरीत गांजाची शेतीची लागवड करण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाली. यावेळी जळगाव जामोद पोलिसांनी अगोदर सदर माहितीची शहानिशा केली असता त्यांना सदर भिंगारा गावाच्या परिसरातील दरीमध्ये दोन ते अडीच एकारात गांजांची लागवड करण्यात आल्याचे आढळून आले. यावरून जळगाव जामोद पोलिसांनी 3 नोव्हेंबरच्या सायंकाळी पोलिसांचा फौजफाटा घेवून भिंगारा गावातील पहाडी भागात असलेल्या दरीमध्ये जावून छापा टाकला व गांजांची शेतीची लागवड केल्याचे उघड केले. सदर शेतीमध्ये जवळपास दोन कोटी रूपयांच्या गांजाची लागवड केल्याचे उघडकीस आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधिक्षक विश्व पानसरे, अपर पोलिस अधिक्षक अशोक थोरात यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता सदर जमिन ही वनविभागाची असून ती ई-क्लास जमीन अनिल हिरालाल वासले रा. भिंगारा यास शेतीसाठी दिल्याचे समजले. पोलिसांनी सदर गांजाची रोपटे जप्त केली आहे. वृत्त लिहेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.
वनविभागाचे अधिकारी झोपेत
जळगाव जामोद परिसरात बहुतांश भाग हा जंगलाचा आहे. सदर परिसर वनविभागाच्या अधिन असून वनअधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर गांजाची शेतीची लागवड करण्यात आलेली असतांना वनअधिकाऱ्यांकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचेही यामध्ये आर्थिक संबंध असल्याचे बोलल्या जात आहे. वनविभागाच्या जागेत गांजांची लागवड हा मोठा गंभीर प्रश्न असून वनविभागाचे अनेक वरीष्ठ अधिकारीसुध्दा पोलिसांच्या तपासात समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.