Bus crashes into pit in Uttarakhand : उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात सोमवारी बस खोल दरीत कोसळून 36 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 24 जण जखमी झाले. जखमींपैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
मार्चुला (उत्तराखंड) : उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात सोमवारी बस खोल दरीत कोसळून 36 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 24 जण जखमी झाले. जखमींपैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
घटनेच्या वेळी 43 आसनी बसमध्ये सुमारे 60 लोक प्रवास करत होते. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असणे हे अपघातास कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा दंडाधिकारी आलोक कुमार पांडे यांनी सांगितले की, गढवाल मोटर ओनर्स असोसिएशनद्वारे संचालित 43 आसनी बस काल संध्याकाळी गढवाल प्रदेशातील पौरी येथून निघाली होती आणि सुमारे 250 किमी अंतरावर असलेल्या कुमाऊंमधील रामनगरला जात होती. सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला. ही बस रामनगरपासून अवघ्या 35 किमी अंतरावर होती, जेव्हा ती अल्मोडा येथील मार्चुला भागात 200 मीटर खोल दरीत पडली, असे अधिकाऱ्याने सांगितले.