Buldhana Crime: नोकरीचे आमिष देत युवकाला  ३ लाख ६० रूपयांचा गंडा; आरोपी निलेश गवळी विरूद्ध गुन्हा दाखल 

Buldhana Crime:

Buldhana Crime: आरोग्य सेवक पदाच्या रिक्त जागी नोकरीवरून लावून देतो, असे सांगत बुलढण्यातील निलेश गवळी याने एकाची ३ लाख ६० हजार रूपयांची फसवणूक केली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांना पवन भारती (रा. मलकापूर) यांनी तक्रार दिली. त्यानुसार, गवळी याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Buldhana Crime:
आरोपी निलेश गवळी

मलकापूर (जि. बुलढाणा)  : आरोग्य सेवक पदाच्या रिक्त जागी नोकरीवरून लावून देतो, असे सांगत बुलढण्यातील निलेश गवळी याने एकाची ३ लाख ६० हजार रूपयांची फसवणूक केली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांना पवन भारती (रा. मलकापूर) यांनी तक्रार दिली. त्यानुसार, गवळी याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलढाणा येथील रहिवासी विजय निलेश गवळी याचे मासे विक्रीचे दुकान आहे. दुकानात पवन भारती यांचे नेहमी येणे जाणे होते. २०२४ मध्ये पवन आणि निलेश यांची चांगली ओळख झाली होती. त्यावेळी तक्रारदार पवन भारती हे एका खाजगी पतसंस्थेत वसुली अधिकारी पदावर कार्यरत होते. २०१९ मधील आरोग्य सेवक पदाच्या रिक्त जागांच्या भरतीसंदर्भात निलेश गवळी याने पवन भारती यांना सांगितले. तुला नोकरीवर लावून देतो. माझे मंत्रालयापर्यंत संबंध आहेत, एव्हढेच नाही तर माझ्या पत्नीलाही मी नोकरीवर लावून दिले, असे गवळी याने सांगितले. यावर पवने विश्वास ठेवला, मात्र त्यांचा विश्वाससंपादित करून फसवणूक होत असल्याचे त्यांना समजले नव्हते.
नोकरी लागणार म्हणून, गवळीच्या सांगण्यावरुन पवनने आपल्या बँक खात्यातील अडीच हजार रुपये गवळीला दिले. त्यानंतर ऑनलाइन ५० हजार, नगदी ५० हजार पुन्हा १० हजार असे एकूण ३ लाख ६० हजार रूपये गवळीला सुपूर्द केले. गवळी आपल्याला नोकरीला लावेल, असा गैरसमज असल्याने त्यांनी इतके पैसे त्याला दिले. पुढे मात्र, अडचण निर्माण झाली.

गवळी बेपत्ता झाला अन् खात्री पटली…

वारंवार फोन करून नोकरी कधी लावणार? असा तगादा लावल्यावर निलेश गवळी याने विविध कारणे देवून चालढकल केली. निवडणुकीनंतर आदेश काढून देतो अशी खोटी बतावणी तो करत असे. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पवनने निलेश याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फोन बंद होता. त्यामुळे, पवन भारती यांनी निलेश गवळी याच्या बुलढाणा येथील घराकडे धाव घेतली. तेव्हा निलेश बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. तेव्हा पवन भारती यांना फसवणूक झाल्याची खात्री पटली. त्यानंतर मलकापूर शहर पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार दिली. यावरून निलेश गवळी याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सुनिल राऊत हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »