Buldhana constituency vote counting: सिंदखेड राजात ६ हजार ३५१ मतांनी डॉ. राजेंद्र शिंगणे आघाडीवर!

Buldhana constituency vote counting

Buldhana constituency vote counting: मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीत सद्यस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे डॉ. राजेंद्र शिंगणे ६ हजार ३५१ मतांनी आघाडीवर आहेत.

Buldhana constituency vote counting

बुलढाणा :  मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीत सद्यस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे डॉ. राजेंद्र शिंगणे ६ हजार ३५१ मतांनी आघाडीवर आहेत.

जिल्ह्यात मैत्रीपूर्ण लढत होत असलेला एकमेव मतदार संघ म्हणजे सिंदखेडराजा. इथे महायुतीकडून दोन उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवारांना धोबीपछाड देऊन महाविकास आघाडीचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आघाडी घेतली. डॉ. शिंगणे यांनी ४० हजार २६४, तर दुसऱ्या क्रमांकावर आलेले मनोज कायंदे यांनी ३३ हजार ९१७ मते आहेत. शिंदे सेनेचे शशिकांत खेडेकर ३० हजार ७०६ मते घेऊन पिछाडीवर आहेत. तिरंगी लढतीत राजेंद्र शिंगणे सध्यातरी वरचढ करत असल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »