Buldhana constituency vote counting:  युतीचे संजय गायकवाड पुन्हा ‘आघाडीवर ‘!

Buldhana vote counting

Buldhana constituency vote counting: विधानसभा मतदारसंघाचे महायुती शिंदेसेनेचे उमेदवार संजय गायकवाड यांनी पुन्हा आघाडी घेतली असून, १६६३ मतांनी ते पुढे आहेत.

Buldhana vote counting

बुलढाणा :  विधानसभा मतदारसंघाचे महायुती शिंदेसेनेचे उमेदवार संजय गायकवाड यांनी पुन्हा आघाडी घेतली असून, १६६३ मतांनी ते पुढे आहेत.

१३ व्या फेरीत महाविकास आघाडीच्या जयश्री शेळके यांनी गायकवाड यांचा लीड कापत आघाडी घेतली होती, मात्र युतीचे गायकवाड पुन्हा एकदा आघाडीवर आले आहेत. सोळाव्या फेरी अखेरीस संजय गायकवाड यांना ५९ हजार १११ मते तर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांना ५७ हजार ४५५ मते मिळाली. अजूनही आठ फेऱ्या बाकी असून, कुठल्या फेरीत काय बदल होतो. हे पाहणं अतिशय उत्सुकतेचे ठरत आहे. सुरुवातीपासून संजय गायकवाड आघाडीवर असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना देखील पुढच्या फेरीत यश मिळेल अशी आशा दिसत आहे. प्रतिष्ठेची ठरलेल्या लढतीत वेगवेगळ्या वळणावर मतदारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचत आहे. संपूर्ण मतदार संघाचे नव्हे तर जिल्ह्याचे देखील लक्ष बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या निकालाकडे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »