Buldhana Breaking: जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदाचे निकाल आता समोर येऊ लागले आहेत. आतापर्यंतच्या निकालात भाजपाला सर्वाधिक ३ जागांवर विजय मिळाला आहे, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनीही खाते उघडले आहे.

बुलढाणा : जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदाचे निकाल आता समोर येऊ लागले आहेत. आतापर्यंतच्या निकालात भाजपाला सर्वाधिक ३ जागांवर विजय मिळाला आहे, तर काँग्रेसला २ जागांवर विजय मिळाला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे प्रत्येकी एक एक उमेदवार विजयी झाले आहेत.
जिल्ह्यातील ‘या’पालिकांमधून नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार
1)सिंदखेड राजा, सौरभ तायडे, राष्ट्रवादी शरद पवार गट .
२) लोणार, मीरा भूषण मापारी, काँग्रेस.
३) खामगाव, अपर्णा फुंडकर, भाजपा .
४) देऊळगाव राजा , माधुरी शिपणे, राष्ट्रवादी अजित पवार गट
५) मलकापूर, आतिक जवारीवाले, काँग्रेस
६) नांदुरा , मंगला मुरेकर, भाजपा
७) जळगाव जामोद, गणेश दांडगे, भाजपा
