Buldhana Assembly Election 2024: सेना विरूद्ध सेना ; प्रचार तोफांच्या फेरीत उमेदवार एकमेकांविरोधात कडाडले

Buldhana Assembly Election 2024

Buldhana Assembly Election 2024: मतदानाचा दिवस जवळ येत असल्याने उमेदवारांकडून प्रचाराला गती देण्यात आली आहे. गावभेटी, प्रचारसभांचा जोर वाढला असून, आता उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या तोफा डागत असल्याचे दिसून येते. दोन्ही शिवसेनेसाठी प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्ये आता बुलढाणा मतदार संघांत उमेदवारांमध्ये वाकयुद्ध सुरू झाल्याचे चित्र आहे.

Buldhana Assembly Election 2024

अभिषेक वरपे /  बुलढाणा :  मतदानाचा दिवस जवळ येत असल्याने उमेदवारांकडून प्रचाराला गती देण्यात आली आहे. गावभेटी, प्रचारसभांचा जोर वाढला असून, आता उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या तोफा डागत असल्याचे दिसून येते. दोन्ही शिवसेनेसाठी प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्ये आता बुलढाणा मतदार संघांत उमेदवारांमध्ये वाकयुद्ध सुरू झाल्याचे चित्र आहे. मतदारांच्या चर्चेमधून हे स्पष्ट होते.
बुलढाणा विधानसभा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. इथे शिंदेसेनेचे विद्यमान आमदार संजय गायकवाड महायुतीकडून निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तर खरी शिवसेना कुणाची हे दाखवून देण्यासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसमधून उद्धवसेनेत प्रवेश केलेल्या जयश्री शेळके ह्या मैदानात आहेत. दरम्यान, दोन्ही उमेदवारांचा प्रचार जोमात सुरू आहे. मतदार संघात दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रचारादरम्यान युती- आघाडीच्या कार्यकर्त्यांसह उमेदवार देखील आता एकमेकांवर टीकेचे आसूड उगारत असल्याचे चित्र आहे. जयश्री शेळके यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची प्रचार सभा शुक्रवारी पार पडली. यामध्ये जयश्री शेळके यांचे भाषण वादळी ठरले. तर दुसरीकडे महायुतीचे संजय गायकवाड यांनी देखील मोताळा येथे सभा घेत आपल्या भाषणातून जयश्री शेळके यांना लक्ष्य केले.

‘गायकवाड हे नकली दाताप्रमाणे..’

नकली दाताप्रमाणे शिवसेनेचे नकली वाघ असल्याचा घणाघात जयश्री शेळके यांनी विद्यमान आमदारांवर केला. पुढे त्या म्हणाल्या, मतदारसंघामध्ये उर बडवून विकास कामांचा ढोल वाजवला जात आहे. मुळात विकास कामांच झालं काय? आमच्यापर्यंत आले काय? असे बोलण्याचे वेळ सामान्य मतदारांना आली आहे. गावागावांमद्धे मोठे फलक लावण्यात आले, लहान लहान गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाल्याचे सांगितल्या जाते, मात्र जी कामे आधीच्या लोकप्रतिनिधीनी केली, स्थानिक स्वराज्यच्या लोकप्रतिनिधीनी केली, जी ग्रामपंचायतीची होती ती कामे यांनी यांच्या बोर्डावर लावल्याचा आरोप शेळके यांनी केला.

‘मातोश्रीवर खोके पाठवून रातोरात तिकीट मिळवले..’

आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप केला जातो. मात्र, यांनी रातोरात मातोश्रीवर खोके पाठवून उमेदवारी मिळवली असा आरोप आ. संजय गायकवाड यांनी केला. आम्हाला गद्दार म्हणून त्यांनी गाडण्याची भाषा केली. त्यांनी अनेक ठिकाणी उमेदवारी मागितली होती. काँग्रेसला जागा सुटत नसल्याने यांचे वंचितच्या यादीत नाव, वंचितमध्ये जमले नाही तर मातोश्रीवर गेल्या.. रविकांत तुपकर यांचा एबीफॉर्म तयार असताना रात्री मातोश्रीवर जाऊन दहा खोके दिले आणि उमेदवारी मिळवली, अशा शब्दांत गायकवाड यांनी दुरंगी लढतीचा दावा खोडून काढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »