क्षुल्लक कारणावरुन भावाकडून भावाचा खून; सुटाळा बुद्रुकमध्ये खळबळ

खामगाव :    नुकतेच तालुक्यातील राहुड येथे सख्या मोठ्या भावाने लहान्या भावाचा खून करून पुरावा नष्ट केल्याची घटना ताजी असतानाच तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे दारूच्या वादातून सख्ख्या भावाकडून भावाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

      पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देविदास महादेव गायकी (२८) असे मृतकाचे नाव आहे. तर मंगेश महादेव गायकी (२५) हा आरोपी आहे. दोघेही सख्खे भाऊ असून ते सुटाळा बुद्रुक येथील नागोबा मंदिराजवळ राहतात. या घटनेबाबत मृतकाची आई लीला महादेव गायकी (४३) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत असे की, ५ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास देविदास गायकी हा आपल्या मित्रासोबत दारू पिऊन घरी आला. त्यावेळी आरोपी मंगेश गायकी याने मृतकाच्या मित्राला घरी जाण्यास सांगितले. या कारणावरून देविदास याला राग आला आणि दोघा मृतक देविदास गायकी भावांमध्ये वाद झाला. वाद वाढत जाऊन भांडणात रूपांतर झाले. भांडणादरम्यान देविदास यांनी हातातील कडेने मंगेशच्या डोक्यावर मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर संतापलेल्या मंगेशने घरातून भाजी कापण्याचा चाकू आणून देविदास यांच्या डाव्या कुशीवर व पोटावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या देविदास यांचा यात मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादीच्या तोंडी अहवालावरून पोलीसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ (१) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी मंगेश महादेव गायकी याला पोलीसांनी अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »