वैजापूर : तक्रारदारांच्या आजोबाच्या नावे असलेल्या शेत जमिनीच्या कागदपत्रावर तक्रारदार, त्यांची आई व इतर नातेवाईकांच्या नावाची नोंद करण्यासाठी दोन हजार 500 रुपयांची लाच स्विकारणाऱ्या वैजापूर तालुक्यातील भायगाव येथील महिला तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवार, 21 एप्रिल रोजी राहत्या घरी रंगेहाथ पकडले. अमिता सुरेशराव लंगडे (37 वर्ष), रा. फुलेवाडी रोड, वैजापूर असे लाचखोर महिला तलाठ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांची वैजापूर तालुक्यातील भायगाव येथील गट क्रमांक 16 मध्ये शेत जमीन आहे. सदरील जमीन तक्रारदार यांच्या आजोबांच्या नावावर आहे. तक्रारदार यांचे आजोबा व वडिल दोघेही मयत झाले असल्याने आजोबांच्या नावाच्या ठिकाणी तक्रारदार, त्यांची आई व इतर नातेवाईकांच्या नावाची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी तक्रारदारांनी तलाठी अमिता लंगडे यांच्याशी संपर्क केला होता. त्यावेळी तलाठी लंगडे यांनी तीन हजार रुपये लाच देण्याची मागणी केली होती. तडजोडीअंती 2 हजार 500 रुपये देण्याचे ठरले होते. परंतु तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय वगरे, केशव दिंडे, पोलिस अंमलदार अशोक नागरगोजे, साईनाथ तोडकर, चांगदेव बागुल आदींच्या पथकाने अमिता लंगडे यांच्या घरी सापळा रचून दोन हजार 500 रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.