छत्रपती संभाजीनगर : कंत्राटदाराचे काम करण्यासाठी माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी तब्बल बारा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोड करुन सहा लाख रुपयांची लाच स्विकारतांना त्यांना माजलगाव येथील राहत्या घरीच छत्रपती संभाजीनगर येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी 10 जुलै रात्री नऊच्या सुमारास करण्यात आली.

काही शासकीय कामांशी संबंधित फाईल्स मंजूर करून देण्यासाठी मुख्याधिकारी चव्हाण यांनी कंत्राटदाराला बारा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र संबंधित कंत्राटदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी यासंदर्भातील छत्रपती संभाजीनगर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची सत्यता पडताळल्यानंतर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. आज गुरुवारी साडे नऊ च्या सुमारास माजलगाव शहरातील पिताजीनगरी येथे किरायाच्या घरी चव्हाण याने सहा लाख रुपयांची लाच स्विकारली. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख केशव दिंडे यांच्यासह त्यांच्या टिमने चव्हाणला रंगेहाथ पकडले. या कारवाई दरम्यान एसीबीकडून घर झडती घेतली जात असून ती सद्या सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दोन सा.बा.चे अधिकारी रडारवर
माजलगाव तालुक्यात केलेल्या कामाची बिले काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार लाचेची मागणी करण्यात येते या प्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे अनेक तक्रारी असून या संदर्भात माजलगाव तालुक्यातील दोन सा. बा. चे अधिकारी रडारवर असल्याची माहिती सूत्रनी दिली.