बुलढाण्यात रविवारी संत निरंकारी मंडळाच्यावतीने रक्तदान शिबिर:  मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन 

बुलढाणा : संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन अंतर्गत येत्या रविवारी, 11 जानेवारीला रक्तदान शिबिर आणि आध्यात्मिक सत्संग सोहळ्याचे आयोजन येथील क्रीडा संकुल रोडवरील पांडुरंग लॉन्स येथे करण्यात आले आहे. या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

बुलढाणा : संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन अंतर्गत येत्या रविवारी, 11 जानेवारीला रक्तदान शिबिर आणि आध्यात्मिक सत्संग सोहळ्याचे आयोजन येथील क्रीडा संकुल रोडवरील पांडुरंग लॉन्स येथे करण्यात आले आहे. या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

संत निरंकारी मिशन ही एक आध्यात्मिक विचारधारा आहे. जगभरात निरंकारी मिशनद्वारे  चॅरिटेबल फाऊंडेशन अंतर्गत रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड तसेच स्वच्छता अभियान यासारखे उपक्रम राबविले जातात. रक्त संकलनात जगातील अग्रस्थानी असलेल्या संस्थांपैकी एक  निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनची ओळख आहे. मानवतेचे कल्याण हे परमध्येय माणून तयानुसार निरंकारी मंडळाचे कार्य सुरू आहे. मिशनच्या विद्यमान प्रमुख सद्गुरू माता सुदिक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली  होणारा आध्यात्मिक सत्संग मानवी जीवनाच्या  उद्धाराचा मार्ग ठरला आहे. बुलढाणा शहरातही निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन द्वारा रविवारी क्रीडा संकुल रोडवरील पांडुरंग लॉन येथे सकाळी 9 ते दुपारी 3 यावेळेत रक्तदान शिबिर पार पडेल.  प्रमुख उपस्थितीत संत निरंकारी मिशनचे बुलढाणा जिल्हा संयोजक शालीग्राम चवरे, प्रचारक नारायण चव्हाण हे असतील. यानंतर, सायंकाळी 6 ते 9 यावेळेत नारायण चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आध्यात्मिक सत्संग सोहळा होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मंडळाचे बुलढाणा मुखी हनुमान भोसले, सेवादल शिक्षक सुभाष राजपूत यांनी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »