BJP’s Shyam Khode wins in Washim : वाशीम मंगरुळपीर विधानसभा मतदार संघात शिवसेना उबाठा चे डॉ. सिद्धार्थ देवळे यांना भाजपचे उमेदवार श्याम खोडे यांनी पराभूत करून भाजपचा गड कायम ठेवला आहे.
गजानन देशमुख / वाशीम : वाशीम मंगरुळपीर विधानसभा मतदार संघात शिवसेना उबाठा चे डॉ. सिद्धार्थ देवळे यांना भाजपचे उमेदवार श्याम खोडे यांनी पराभूत करून भाजपचा गड कायम ठेवला आहे.
शिवसेना उबाठा उमेदवार सिद्धार्थ देवळे यांनी उमेदवारी मिळवण्यापासून प्रचारात चांगलीच आघाडी घेतली होती. एक्झिट पोल मध्ये त्यांचेच नाव संभाव्य आमदार म्हणून होते. मात्र, मतमोजणीत श्याम खोडे यांना मिळत असलेले मताधिक्य कापता आले नाही. शिवसेनेच्या सिद्धार्थ देवळे यांना 20 हजार 63 मतांनी भाजपाचे श्याम खोडे यांनी पराभूत करून विजय संपादित केले.
भाजपचे विद्यमान आमदार लखन मलिक यांना डावलून नवख्या श्याम खोडे यांना उमेदवारी दिल्याने भाजपचा पराभव निश्चित मानल्या जात असताना शिवसेना बंडखोर राजाभैय्या पवार आणि निलेश पेंढारकर यांनी भाजपाला जाहीर पाठिंबा दिल्याने भाजपा विजय सुखर झाला. भाजपचे कार्याध्यक्ष राजू पाटील राजे, अशोक हेडा यांच्यासह अनेकांनी मतदारपर्यंत जाऊन शरतीचे प्रयत्न केल्याने भाजपाला विजय संपादित करता आला असे भाजपचे गजानन ठेंगडे यांनी सांगितले.