BJP’s Randhir Savarkar wins in Akola East: अकोला पूर्वमध्ये रणधिर सावकर ५० हजारांच्या फरकाने विजयी

Akola vote counting

BJP’s Randhir Savarkar wins in Akola East: विधानसभेच्या अकोला पूर्व मतदारसंघात भाजपाचे उमदेवार रणधीर सावरकर यांचा ५० हजार ३०६ मतांनी मोठा विजय मिळवला आहे. या विजयामुळे भाजपाच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्यी आतिषबाजीत जल्लोष केला.

Akola vote counting
अकोला :  विधानसभेच्या अकोला पूर्व मतदारसंघात भाजपाचे उमदेवार रणधीर सावरकर यांचा ५० हजार ३०६ मतांनी मोठा विजय मिळवला आहे. या विजयामुळे भाजपाच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्यी आतिषबाजीत जल्लोष केला.
यंदाच्या विधानसभा निवडणूकीत अकोला पूर्व मतदारसंघात भाजपाचे उमेदवार रणधिर सावरकर, शिवसेना (ठाकरे गट)चे गोपाल दातकर आणि वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने यांच्यात तिरंगी लढत झाली. शनिवारी सकाळी मतमोजणीतून मतदारांचा कौल उलगडू लागला. त्यात पहिल्या फेरीपासूनच विद्यामान आमदार रणधिर सावरकर यांनी आघाडी घेतली, ती अंतिम फेरीपर्यंत कायम राहिली. भाजपाचे उमेदवार रणधिर सावरकर यांना १ लाख ७ हजार २६७ मत मिळाले. तर गोपाल दातकर यांना ५६ हजार ९५६ आणि ज्ञानेश्वर सुलताने यांना ५० हजार १०७ मते मिळाली. या निवडणूकीत भाजपाचे उमेदवार रणधिर सावरकर यांनी ५० हजार ३०६ मतांची आघाडी घेत मोठा विजय मिळवला. या विषयानंतर अकोला पूर्व मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अतिषबाजी करत जल्लोष केल्याचे चित्र दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »