जालना : जिल्ह्यातील भोकरदन, अंबड, परतूर येथील नगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवार, 2 डिसेंबर रोजी मतदान सुरू आहे. दरम्यान, परतूर येथील प्रभाग क्रमांक मधील इंदिरानगर येथील मतदान केंद्रावर ईव्हीएममधील क्रमांक 3 वरील उमेदवारापुढचे बटण दबत नसल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. क्रमांक तीनवर भाजपाचे उमेदवार असून नेमके त्यांच्याच नावापुढे असलेले बटण दबत नसल्यामुळे भाजपाचे नेते राहुल लोणीकर यांनी आक्षेप घेत या ठिकाणचे ईव्हीएम तत्काळ बदलून देण्याची मागणी केली आहे.

ईव्हीएमवरील निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या नावापुढे निवडणूक चिन्ह आणि बटण दिलेले आहे. मतदारांना त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढील बटण दाबून मतदान करावे लागते. दरम्यान, परतूर येथील प्रभाग क्रमांक एक मधील इंदिरानगर येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम वरील तीन क्रमांकाच्या भाजपाच्या उमेदवाराच्या नावापुढील बटण दाबण्यास मतदारांना अडचण येत असून हे बटण दबत नसल्यामुळे मतदानापासून वंचित रहावे लागत असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मतदान केंद्राधिकाऱ्यांकडे केला. यावेळी भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर यांनी या केंद्राला भेट देऊन मतदान केंद्रावरील ईव्हीएम बदलून देण्याची किंवा तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी सांगितले की, तांत्रिक अधिकारी यांना पाचारण करण्यात आले असून ईव्हीएम मधील अडचण दूर केली जात असल्याचे यावेळी सांगितले.