dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक जण गंभीर जखमी गंगापूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात

गंगापूर : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने कारने समोरुन येणाऱ्या दुचाकीस दिलेल्या धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवार, 26 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास गंगापूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील हॉटैल विराज गार्डन समोर घडला.

गंगापूर : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने कारने समोरुन येणाऱ्या दुचाकीस दिलेल्या धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवार, 26 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास गंगापूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील हॉटैल विराज गार्डन समोर घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र भागचंद पंडित (४५ वर्ष), रा. पेंडापूर, ता. गंगापूर असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर विक्रम जाधव, रा. क्रांतीनगर, छत्रपती संभाजीनगर असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. मयत राजेंद्र पंडित व विक्रम जाधव हे दोघेही गंगापूर एस.टी. आगारात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी सायंकाळी डयुटी संपल्यावर राजेंद्र पंडित व विक्रम जाधव हे दोघेही दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एचके-४६५०) वर घरी जात होते. गंगापूर ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील हॉटेल विराज गार्डनसमोर त्यांच्या दुचाकीस समोरुन येणाऱ्या कार क्रमांक (एमएच-२०-जीव्ही-६८७०) ने धडक दिली. अपघातात जखमी झालेल्या राजेंद्र पंडित व विक्रम जाधव यांना उपचारासाठी गंगापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी राजेंद्र पंडित यांना तपासून मृत घोषित केले. तर गंभीर जखमी झालेल्या विक्रम जाधव यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची नोंद गंगापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top