Bhoomipujan of the new building of Jai Jagdamba Veda Vidyalaya : मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन

Bhoomipujan of the new building of Jai Jagdamba Veda Vidyalaya

Bhoomipujan of the new building of Jai Jagdamba Veda Vidyalaya : येथील श्री महर्षी वेद व्यास प्रतिष्ठान, आळंदी अंतर्गत जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

Bhoomipujan of the new building of Jai Jagdamba Veda Vidyalaya
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन

खामगांव : येथील श्री महर्षी वेद व्यास प्रतिष्ठान, आळंदी अंतर्गत जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
खामगांवमधील घाटपुरी येथील श्री. जय जगदंबा माता संस्थान येथे आयोजित या भूमिपूजन समारंभास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड, संस्थानाचे अध्यक्ष पंकज केला, उपाध्यक्ष कृष्णकुमार भट्टड, संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम श्री जगदंबा मातेचे दर्शन घेवून पूजन केले. तसेच जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन करुन कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी संस्थानाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी वारकरी संप्रदायांशी संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »