आईपीएल क्रिकेट सामन्यांवर बुलढाण्यात सट्टेबाजी; दोघांना अटक 

बुलढाणा : देशात आयपील सामन्यांचा ‘क्रिकेटोतस्व’ सुरू आहे. दरम्यान, बुलढाणा शहरात आईपीएल क्रिकेट सामन्यांववरून सट्टेबाजी लावल्याचा प्रकार रविवारी झालेल्या मुंबई व दिल्लीच्या सामन्या दरम्यान समोर आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई  करित दोघांना अटक केली आहे. 

जगदीश देविदास भोसले (47वर्ष), रवी देतितास मोसले (44वर्ष) रा.संभाजीनगर,   बुलढाणा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोघे घरात आईपीएल सामन्याववरून जुगार खेळताना आढळले. त्यांच्याकडून एलईडी (किंमत 15  हजार, दोन मोबाईल (किंमत 27 हजार) असा एकूण 42 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक लांडे व सुनिल अबुंलकर यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.  दोन्ही जुगाऱ्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरची कारवाई पीएसआय पंकज सपकाळे, हे.कॉ. दीपक लेकुरवाळ, एजाज खान, दिगंबर कपाटे, एनपीकॉ विजय पैठणे, पो. कॉ. गजानन गोरले, दीपाली चव्हाण यांनी केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहे. या सट्टेबाजीत आणखी कोण कोण सहभागी आहेत? याचाही शोध पोलीस घेत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »