विटांचे वाहतूक करणारा ट्रक आणि मध्यप्रदेश परिवाहानच्या बसचा भीषण अपघात, ट्रक मधील तिघे ठार 

अनुप गवळी / खामगाव – विटांची वाहतूक करणारा भरधाव ट्रक आणि मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या बसचा भीषण अपघात होऊन ट्रक मधील चालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला तर बस मधील 18 प्रवाशी जखमी झाल्याची घटना 15 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजेदरम्यान खामगाव नांदुरा मार्गावरील आमसरी फाट्याजवळ घडली.

अनुप गवळी / खामगाव – विटांची वाहतूक करणारा भरधाव ट्रक आणि मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या बसचा भीषण अपघात होऊन ट्रक मधील चालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला तर बस मधील 18 प्रवाशी जखमी झाल्याची घटना 15 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजेदरम्यान खामगाव नांदुरा मार्गावरील आमसरी फाट्याजवळ घडली.

         खामगाव शेगाव मार्गावर झालेल्या तिहेरी अपघाताची घटना ताजी असतानाच 15 एप्रिल रोजी पुन्हा मध्य प्रदेश परिवहन च्या बसचा आणि विटांची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथून विटा भरून नांदुराच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक एम एच 28 बीबी 29 सकाळी सात वाजता आमसरी फाट्यावर पोहोचला असता नांदुऱ्याकडून खामगाव कडे प्रवासी घेऊन येणारी मध्य प्रदेश परिवहन मंडळाची बस क्रमांक एमपी 68 झेडसी 5939 मध्ये भीषण अपघात झाला. सदर अपघात इतका जोरदार होता की ट्रक मधील चालक पातोळ्या मानसिंग भेयड्या (35), मजूर प्रेमसिंग धारवे, बळीराम कोतवाल या तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या बसमधील जवळपास 18 प्रवासी जखमी झाले असून यातील सहा प्रवाशांची प्रकृती चिंताजनक झाल्याचे माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच खामगाव व जलम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बसमधील जखमी प्रवाशांना तातडीने सामान्य रुग्णालय येथे उपचारार्थ भरती करण्यात आले तसेच सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय टीमने सुद्धा जखमीवर तातडीने उपचार सुरू केले असून यातील चिंताजनक असलेल्या सहा प्रवाशांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले आहे. वृत्त लिहेपर्यंत पोलिसांची कार्यवाही सुरू होती.

 अशी आहे जखमींची नावे

 अपघातात जखमी झालेल्या मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या बसमधील जखमींमध्ये शंकर पिना जानू जटाळे रा. टाकणार, ज्ञानेश्वरी प्रल्हाद कळंब रा. अकोला, धीरज सेवनात धंजय ज्योती धीरज धंजय रा. अकोला, वसीम शेख बशीर रा. बऱ्हाणपूर,  बबीता संतोष भोजने रा. खामगाव, विमल सुरेश मिश्रा रा. खामगाव, समाधान श्रीकृष्ण बोरे रा.  आडोल, श्यामलाल बाबुलाल काजगर, उषा यादव, ऐश्वर्या प्रकाश चव्हाण, वैष्णवी रमेश अवचार, गजानन नामदेव यादव, शैलजा रवींद्र शिंदे, समृद्धी रवींद्र शिंदे, ज्योती संजय गोसावी रा. नेर यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »