Balivanshiya Movement’s boycott of Lok Sabha election: बळीवंशीय चळवळीचा लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार कायम

Bukdhana Loksabha
 Balivanshiya Movement’s boycott of Lok Sabha election polls continues:लोकसभा निवडणूकीच्या मतदानावर टाकलेल्या बहिष्कारासंबंधी चर्चा जरी झाली असली तरी बैठकीला विविध खात्यांचे अधिकारी गैरहजर राहिल्याने अजूनतरी बहिष्कार मागे घेतला नसल्याचे बळीवंश चळवळीच्यावतीने कळविण्यात आले आहे.
सिंदखेडराजा (जि.बुलढाणा) :  लोकसभा निवडणूकीच्या मतदानावर टाकलेल्या बहिष्कारासंबंधी चर्चा जरी झाली असली तरी बैठकीला विविध खात्यांचे अधिकारी गैरहजर राहिल्याने अजूनतरी बहिष्कार मागे घेतला नसल्याचे बळीवंश चळवळीच्यावतीने कळविण्यात आले आहे.
तालुक्यातील शेतकरी पुत्रांनी सुरु केलेल्या बळीवंश चळवळीच्या वतीने शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार नसतील, तर लोकसभा मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे विविध अधिकाऱ्यांपासून तर निवडणूक आयोगापर्यंत देण्यात आला होता. यासंदर्भाने २७ मार्च रोजी एसडीओ संजय खडसे, तहसीलदार सचिन जैस्वाल व बळीवंश चळवळीचे नितीन कायंदे, गजानन जायभाये, शरद सोनुने, महादेव बुधवत, उद्धव काकडे, केशव जायभाये, कैलास मेहेत्रे, अनिल दराडे, दीपक नागरे आदी प्रतिनिधी व पत्रकार यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यात शेतकऱ्यांच्या खात्यांना बॅंकांनी लावलेले होल्ड काढावेत.
विहीरीच्या योजनेतील भ्रष्टाचार, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना देण्यात येत असलेली वागणूक यासह वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना अर्ज करून ६-६ महिने झाले आहे तरी मिळाली नाही. ती मदत सव्याज तात्काळ मिळावी. सिंदखेडराजा, देऊळगावराजा तालुक्यातील भाग हा भूगर्भ विभागाने सेमी क्रिटिकल झोनमध्ये टाकलेला आहे. त्यामुळे एमआरईजीएस अंतर्गत वैयक्तिक विहीर खोदण्यास बंदी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »