कारंजा (लाड) : ब्रिटनमधील एडिनबर्ग येथील हॅरियट वॉट विद्यापीठात रोबोटिक्स टेक्नॉलॉजी व आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयात शिक्षण घेणाऱ्या कारंज्याच्या अयान खान (वय २३) यांचा २५ ऑगस्ट रोजी हारलौ जलाशयात बुडून मृत्यू झाला होता.

गेल्या दहा दिवसांच्या प्रक्रियेनंतर अयानचा मृतदेह एडिनबर्गहून शनिवारी सकाळी भारतासाठी रवाना होणार आहे. रविवारी (७ सप्टेंबर) सकाळी आठ वाजता त्यांचा मृतदेह कारंज्यातील डाफनीपुरा येथील निवासस्थानी ठेवण्यात येईल. दहा वाजता दारव्हा रोडवरील मुस्लिम कब्रस्तानासमोर नमाज-ए-जनाजा अदा केली जाईल.
अयानच्या मृतदेहाच्या भारतात हस्तांतरणासाठी परराष्ट्र मंत्रालय, भारतीय दूतावास, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह नातेवाईकांनी प्रयत्न केले.