ATS arrests three Bangladeshis: एटीएसने अटक केलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

ATS arrests three Bangladeshis

ATS arrests three Bangladeshis :  भोकरदन ( जि. जालना ) तालुक्यातील आन्वा येथील एका स्टोन क्रेशरवर काम करीत असलेल्या तीन बांगलादेशीयांना नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथील दहशतवाद विरोधी पथकाने पारध पोलिसांच्या मदतीने शुक्रवार, 27 डिसेंबर रोजी ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशीरा पारध पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, त्यांना शनिवार, 28 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ATS arrests three Bangladeshis

सादिक शेख / आन्वा : भोकरदन ( जि. जालना ) तालुक्यातील आन्वा येथील एका स्टोन क्रेशरवर काम करीत असलेल्या तीन बांगलादेशीयांना नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथील दहशतवाद विरोधी पथकाने पारध पोलिसांच्या मदतीने शुक्रवार, 27 डिसेंबर रोजी ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशीरा पारध पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, त्यांना शनिवार, 28 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील गट नंबर 381 मध्ये एका स्टोन क्रेशरवर इमदाद हुसेन मोहम्मद उली हमद उर्फ सिपॉन ( वय 26 वर्ष रा. ह.मु. आन्वा ता. भोकरदन जि. जालना मुळ रा. काबील मियारबाडी, बिरनारायणपुर थाना-शेनबाग, तहसील काजीरखिल जि. नोवाखली, बांगलादेश ), हुमायुन कबीर मोहम्मद उली अहमद ( वय 40 वर्ष, रा. ह.मु. कुंभारी / आन्वा ता. भोकरदन जि. जालना मुळ रा. काबील मियारबाडी, बिरनारायणपुर थाना-शेनबाग, तहसील काजीरखिल जि. नोवाखली, बांग्लादेश ), मानिक जैनुल्लाब्दीन खान ( वय 42, ह.मु. कुंभारी/आन्वा ता. भोकरदन जि. जालना मुळ रा. बेपारी मुन्शी कंदी तहसील-चारचांदा थाना- बेदरगंज, जि. शौकीपुर बांग्लादेश ) हे तीन बांगलादेशी असल्याची गोपनीय माहिती दहशत विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर, नाशिक व पारध पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी आन्वा पाडा शिवारात त्यांना ताब्यात घेतले. संशयित बांगलादेशी आरोपी हे बेकायदेशीररित्या कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्राशिवाय व मुलकी अधिकारी यांची परवानगी न घेता घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून आन्वा परिसरातील आन्वापाडा येथे वास्तव्यास होते. त्यांच्या ताब्यातून तीन मोबाईल हँडसेट तर भोकरदन एका जवळ तालुक्यातील कुंभारी, ठाणे येथील एकाच पत्याचे दोन आधार कार्ड, पॅन कार्ड, सापडले, तर भोकरदन येथील एसबीआय बँकेचे पासबुक, नगदी रोख असा मिळून आले. असा 37900 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस कर्मचारी सुरेंद्र खिल्लारे यांच्या फिर्यादीवरून पारध पोलिसांनी शुक्रवारी तीन जणांविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »