नवी दिल्ली: आगामी आशिया चषक टी-20 स्पर्धेचे यजमानपद भारतीय क्रिकेट नियामक मंडळ भूषवणार आहे. ही स्पर्धासंयुक्त अरब अमिराती येथे खेळवली जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

नवी दिल्ली: आगामी आशिया चषक टी-20 स्पर्धेचे यजमानपद भारतीय क्रिकेट नियामक मंडळ भूषवणार आहे. ही स्पर्धासंयुक्त अरब अमिराती येथे खेळवली जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
आशियाईक्रिकेट परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांतयाची अधिकृत घोषणा केली जाईल. या निर्णयामुळे सप्टेंबर महिन्यात क्रिकेटचाहत्यांना पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामनापाहण्याची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. गुरुवारी झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्याबैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीत सर्व 25 सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी प्रत्यक्षकिंवा व्हर्च्युअली सहभागी झाले होते. ‘बीसीसीआय’चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीया बैठकीत व्हर्च्युअल माध्यमातून सहभाग नोंदवला. या बैठकीनंतर स्पर्धेच्याआयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. अधिकृत वेळापत्रकाची घोषणा लवकरचयासंदर्भातबोलताना ‘बीसीसीआय’चे सचिव देवजित सैकिया म्हणाले, आमचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला बैठकीत सहभागी झाले होते. ते लवकरच सदस्यांना माहिती देतील.