Archana Patil’s entry into NCP: अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, धाराशिवमधून उमेदवारी

Archana Patil's entry into NCP

Archana Patil’s entry into NCP: धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच सुनिल तटकरे यांनी लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवारी म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली.

Archana Patil's entry into NCP
Archana Patil’s entry into NCP

धाराशिव : अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सुनिल तटकरे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. महायुतीमधील धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला असल्याने अजित पवार या जागेसाठी आग्रही होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी धाराशिव लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराची घोषणा केली.

धाराशिवमधून अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून महाविकास आघाडीच्या ओमराजे निंबाळकर यांचा त्यांना सामना करावा लागणार आहे.
महायुतीमध्ये धाराशिव मतदारसंघ अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला असून या ठिकाणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सुनिल तटकरे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. गेल्या पंधरा दिवसापासून महायुतीच्या जागा वाटपात धाराशिव लोकसभेचा मतदारसंघावर शिवसेना भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाने आपला दावा सांगितला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »