dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जालन्यात पुन्हा चाकू हल्ला; दारूच्या पैशांवरून युवकाच्या चेहऱ्यावर वार

जालना :  शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शुक्रवार, 24 एप्रिल रोजी सायंकाळी तौहीद पेट्रोल पंप परिसरात एका युवकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

या हल्ल्यात अझहर शेख अब्दुल (वय २७, रा. मदिना मस्जिद परिसर, एकता चौक, चंदनझीरा) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्या चेहऱ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेनंतर आरोपीने जखमी युवक व त्याच्या कुटुंबीयांना धमकावत, “पोलीसात तक्रार केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील,” अशी धमकी दिल्याचे जखमीच्या आईने सांगितले. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच दुःखीनगर भागात अशाच प्रकारचा चाकू हल्ला झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीबाबत चर्चा रंगू लागली असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

जखमी युवकावर सध्या शासकीय सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top