वाशिम : अखेर अनेक दिवसांपासून रंगलेल्या चर्चेला पूर्णविराम देत भारतीय जनता पार्टीने नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून ज्येष्ठ समाजसेवक आणि उद्योगपती अनिल केंदळे यांची अधिकृत घोषणा केली. घोषणा होताच कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष उसळला आणि सोमवारी सकाळी केंदळे यांनी भव्य शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केला.

नगराध्यक्षपदासाठी भाजपामध्ये मोठी इच्छुकांची रांग असतानाच उमेदवार निश्चित करण्यात वरिष्ठ नेतृत्वाने काळजीपूर्वक वावर घेतला. सुरुवातीपासून केंदळे यांचे नाव ‘सर्वसमावेशक चेहरा’ म्हणून आघाडीवर होते. मात्र, अंतिम क्षणापर्यंत ‘वेट अँड वॉच’ भूमिकेतून पक्ष नेतृत्वाने परिस्थितीचे सूक्ष्मपणे मूल्यमापन केले.
दरम्यान, शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अनेक स्थानिक नेते भाजपात दाखल झाल्याने पक्ष बळकट झाला. या नव्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर रविवारी केंदळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. वाशिम नगरपरिषद निवडणुकीत आता भाजपाने ‘केंदळे कार्ड’ उचलल्याने आगामी लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
शहरातून रॅली; कार्यकर्ते, नागरिकांचा सहभाग
१७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता श्री बालाजी मंदिरापासून जोरदार रॅलीला सुरुवात झाली. महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन केल्यानंतर रॅली बसस्थानक मार्गे नगरपरिषद कार्यालयात पोहोचली. दणदणीत नार्यांच्या गजरात अनिल केंदळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी भाजपा वाशिम जिल्हा निवडणूक प्रमुख राजू पाटील राजे, आमदार श्याम खोडे, माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू, माजी नगराध्यक्ष अशोक हेडा, शहराध्यक्ष मनीष मंत्री, तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.