Akola Crime News :दुहेरी हत्येच्या घटनेनं अकोला हादरलं; दोघांना अटक!

Two cases of murder in Chhatrapati Sambhajinagar

Akola Crime News: शहरात बुधवारी मध्यरात्री धारदार शस्त्रांनी दोघांचा खुन केल्याची घटना गुरुवारी सकाली समोर आली आहे.दोन्ही घटना रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत.या प्रकरणी अटक दोन्ही आरोपींनी दोन्ही खुनाची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

Akola shocked by double murder incident!
Akola shocked by double murder incident!

अकोलाः शहरात बुधवारी मध्यरात्री धारदार शस्त्रांनी दोघांचा खुन केल्याची घटना गुरुवारी सकाली समोर आली आहे.दोन्ही घटना रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत.अतुल रामदास थोरात (४०) आणि राज संजय गायकवाड (१८) असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या प्रकरणी अटक दोन्ही आरोपींनी दोन्ही खुनाची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन अज्ञात मारेकऱ्यांनी रेल्वे स्टेशन चौकातच धारदार शस्त्रांनी वार करून अतुल थोरात याची हत्या केली. दुसरी घटना शहरातील देशमुख फैल भागातील राज गायकवाड याच्यावर देखील धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. या हल्ल्यात राजचा मृत्यू झाला. शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या सशस्त्र हल्ल्यानंतर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. या संदर्भात रामदासपेठ पोलिसांनी मारेकऱ्यांविरूद्ध खुनाचे गुन्हे दाखल दाखल करून तपासचक्र फिरविले. घटनेच्या २४ तासांच्या आतच पोलिसांनी देशमुख फैल येथील रहिवासी मनिष शरद भाकर (२१) व ऋषिकेश दीपक आपोतीकर (२०), अशा दोन संदिग्ध आरोपींना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली असून, यामध्ये त्यांच्या आणखी एका मित्राचा समावेश असल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. ही कारवाई पोलिस अधीक्षक बच्चनसिंह, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सतिष कुलकर्णी, मनोज बहुरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक के.डी. पवार, मिरा सोनुने, सदाशिव सुळकर, पोलिस हवलदार शेख हसन शेख अब्दुल्ला, किरण गवई, श्याम मोहळे, अनिल धनभर, संदीप वानखडे, पुजा यंदे यांनी केली.

दोन्ही घटनेत धारदार शस्त्रांचा वापर

रेल्वे स्टेशनजवळील गुजराथी उपहार गृहासमोरुन दुचाकीवरून येत असताना अतुल थोरात याला तीन अज्ञातांनी थांबवून घेरले.त्यांच्यात वाद झाला, वादादरम्यान हाणामारी सुरू झाली. अतुलने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी धारदार शस्त्रांचा वापर करीत त्याच्यावर वार केले.जखमी अतुलची आजूबाजूच्या नागरिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला.परंतु मारेकऱ्यांनी नागरिकांना धमकावल्याची माहिती आहे.अतुलची हत्या करून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठलं.अद्यापपर्यंत अतुल थोरात यांच्या हत्येचं मूळ कारण समजलं नसून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

पहिल्या घटनेचा पंचनामा होत नाही तोच दुसरी हत्या

पहिल्या घटनेच्या घटनास्थळीचा पंचनामा सुरू असतानाच याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भवानी पेठ परिसरात खुनाची दुसरी घटना घडली.देशमुख फाईलजवळच्या भागात राहणाऱ्या राज संजय गायकवाड (18) याचीही तीन अज्ञात आरोपींनी हत्या केल्याचं समजते.

सीसी फुटेजद्वारे घेतला तपास 

राजूचा काही युवकांशी वाद झाला होता.हा वाद मित्रांच्या मदतीने इथंचं शांत झाला. परंतु रात्री २ वाजताच्या सुमारास राजूच्याच घरी काही तरुण आले.त्यांनी धारदार शस्त्रांनी राजूच्या अंगवार वार केले.राजूचे नातेवाईक आरोपींना थांबवण्याचा प्रयत्न करत होते.परंतु तोपर्यंत त्याचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दोन्ही हत्येच्या घटनांमध्ये तीनच आरोपी होते, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली होती. अतुल थोरात यांच्या हत्येच्या ठिकाणचे पोलिसांनी सीसी फुटेज जप्त करत आरोपींचा शोध घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »