वाशीम : जिल्ह्यासह संपूर्ण देशात सोन्या–चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण झाल्याचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले आहे. सकाळी ११ वाजता जाहीर झालेल्या दरांनुसार २४ कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅमसाठी १ लाख ४९ हजार ९०० रुपये इतके नोंदवले गेले असून, २२ कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅमसाठी १ लाख ४६ हजार ८०० रुपये आहेत. तर चांदीचे दर प्रतिकिलो २ लाख ५१ हजार रुपयांवर आले आहेत. विशेष बाब म्हणजे हे सर्व दर जीएसटी व्यतिरिक्त असून, अंतिम खरेदी करताना त्यावर जीएसटी आकारला जाणार आहे.

अलीकडच्या काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. २४ कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅमसाठी तब्बल १ लाख ८० हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र सलग तीन दिवस सातत्याने सोन्याच्या दरात घसरण होत असल्याने आता हे दर जवळपास ३० हजार रुपयांनी कमी झाले आहेत. या घसरणीमुळे अल्पकालीन गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना काही प्रमाणात आर्थिक धक्का बसला असला, तरी सर्वसामान्य ग्राहकांसाठी आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदीची चांगली संधी निर्माण झाली आहे. चांदीच्या दरातही अशीच मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी चांदीचे दर प्रतिकिलो साडेतीन लाखांचा टप्पा ओलांडून गेले होते. मात्र त्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर नफेखोरी झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांमुळे चांदीच्या दरात लक्षणीय घसरण झाली आहे. सध्याच्या घडीला चांदीचे दर जवळपास दीड लाख रुपयांनी कमी झाले असून, त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये पुन्हा हालचाल वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाजारातील जाणकारांच्या मते, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक घडामोडी, डॉलरमधील चढउतार तसेच जागतिक बाजारातील अनिश्चिततेचा थेट परिणाम सोन्या–चांदीच्या दरांवर होत आहे. सोन्या–चांदीच्या दरातील ही मोठी घसरण बाजारासाठी महत्त्वाची ठरत असून, गुंतवणूकदारांना सावध निर्णय घेण्याची गरज असताना सामान्य ग्राहकांसाठी ही घडी खरेदीसाठी अनुकूल मानली जात आहे.