Aditya Thackeray’s attack from Paithan: महाराष्ट्रात उभे राहणारे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या भाजपा सरकारला घरी पाठवा व महाविकास अघाडीचे सरकार निवडणून द्या असे अवाहन युवासेना प्रमुख आ. अदित्य ठाकरे यांनी सोमवार 26 ऑगस्ट रोजी पैठण माहेश्वरी धर्मशाळेतील आयोजित महाराष्ट्र स्वाभिमान संवाद सभेत बोलतांना केले.
पैठण : महाराष्ट्रात उभे राहणारे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या भाजपा सरकारला घरी पाठवा व महाविकास अघाडीचे सरकार निवडणून द्या असे अवाहन युवासेना प्रमुख आ. अदित्य ठाकरे यांनी सोमवार 26 ऑगस्ट रोजी पैठण माहेश्वरी धर्मशाळेतील आयोजित महाराष्ट्र स्वाभिमान संवाद सभेत बोलतांना केले.
यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख राठोड आदींची प्रमूख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यात बेरोजगारी वाढत आहे. शिक्षणाचे प्रश्न उदभवले आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही, असे असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला मुजरे करण्यात मग्न असल्याने महाराष्ट्रातील युवकांचे, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले आहे. गद्दारांनी गद्दारी केली, पण आपल्याला बदला घ्यायचा असून हे सरकार आपल्याला बदलायचे आहे. व महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे. असेही यावेळी ठाकरे म्हणाले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य रँली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आले. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीच्या प्रारंभी गटबाजी पहायवास मिळाली. पेरे गटातील समर्थकांनी गोर्डेंचे नाव न घेता …आयत्या पिठावर रेगाट्या मारणारा नकोय.. निष्ठावंत हवाय असे फलक छळकावत टोला लगावला. यामुळे ठाकरे गटातही विधानसभा निवडणूक्या तोंडावर गटबाजी निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले.