वैजापूर : पर्यावरणास आणि मानवी जीवितास हानिकारक असलेल्या नायलॉन मांजाचा साठा करुन विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी मंगळवार, 9 डिसेंबर रोजी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 2 हजार 600 रुपये किंमतीचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. फारुख महंमद शेख, रा. दर्गा वेस, वैजापूर असे आरोपीचे नाव आहे.

वैजापूर शहरात प्राणघातक नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हेशाखचे सहाय्यक निरीक्षक पवन इंगळे, पोलिस अंमलदार विष्णू गायकवाड, अशोक वाघ, शिवानंद बनगे, अनिल काळे, महेश बिरुटे, सनी खरात, संजय तांदळे, महिला पोलिस अंमलदार भंडारे आदींच्या पथकाने वैजापूर शहरातील दर्गा वेस परिसरात छापा मारुन फारुख महंमद शेख यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून नायलॉन मांजाचे तीन गट्टू, एक लाकडी चक्री असा एकूण 2 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.