छत्रपती संभाजीनगर : जालना महामार्गावरील हसनाबादवाडी येथे एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या कुंटनखान्यावर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक पथकाने 22 जुलै रोजी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी परराज्यातील सहा तर स्थानिक एक अशा सात पीडित महिलांची सुटका केली असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सरला गाडेकर यांनी दिली. हॉटेलमध्ये कुंटनखाना चालविणाऱ्या व्यवस्थापकासह दोन जणांविरुध्द करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर गणेश साळुंके (27 वर्ष), रा. अण्णाभाऊ साठेनगर, चिकलठाणा, राजेश भाऊसाहेब मगरे (27), रा. देवगाव तांडा, ता. बदनापुर जि. जालना अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्गावरील हसनाबादवाडी येथील हॉटेल दिनेश लॉजिंग ॲण्ड बोर्डिंग येथे कुंटनखाना सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी पुजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाच्या सहाय्यक निरीक्षक सरला गाडेकर, करमाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रताप नवघरे, उपनिरीक्षक स्वप्निल नरवडे, विनोद भालेराव, पोलिस अंमलदार दिलीप साळवे, कपिल बनकर, इर्शाद पठाण, भाग्यश्री चव्हाण, मनिषा साळवी, संदीप थोरात, सुनिल गोरे, संतोष टिमकीवर आदींच्या पथकाने हॉटेल दिनेश लॉजिंगवर छापा मारला.
या कारवाईत पोलिसांनी पश्चिम बंगाल येथून देहविक्री करण्यासाठी आलेल्या सहा आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील एक अशा सात महिलांची सुटका केली. याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापक सागर सोळुंके, राजेश मगरे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत पोलिसांनी
मोबाईल व इतर साहित्य मिळून 95 हजार 890 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.