Accident on Nashik-Dindori route:नाशिक-दिंडोरी मार्गावर अपघात; पाच ठार, चार जखमी

Accident on Nashik-Dindori route

Accident on Nashik-Dindori route: बोलेरो गाडी आणि दुचाकीच्या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाल्याची घटना नाशिक दिंडोरी मार्गावर 5 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

Accident on Nashik-Dindori route
Accident on Nashik-Dindori route

नाशिक : बोलेरो गाडी आणि दुचाकीच्या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाल्याची घटना नाशिक दिंडोरी मार्गावर 5 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. हा अपघात नाशिक शहरालगत असलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ घडला आहे.
सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन येताना भाविकांवर काळाने झडप घातली. समोरच्या बाजूने येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवत असताना बोलेरो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बोलेरो गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळली. बोलेरो गाडी आणि रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तर बोलेरो गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. अपघातग्रस्तांमध्ये वाराणसीचे यादव कुटुंबियांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »