Accident News Gangapur: भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवार २३ जून रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ढोरेगाव येथे झाला.

गंगापूर (जि.छ.संभाजीनगर) : भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवार २३ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ढोरेगाव येथे झाला.
नेवासाकडून छत्रपती संभाजीनगरकडे रविवार २३ जून रोजी आपल्या एमएच-१७- सीपी- १०९९ या दुचाकीवरून दोघे जात असताना ढोरेगाव येथे बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक देऊन पसार झाला. छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवरील ढोरेगाव येथे झालेल्या या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. घटनास्थळी शाम शेळके, दत्तात्रय जोशी, किरण गोरे, समीर शेख, वैभव राजदेव, इमरान पठाण यांनी घटनास्थळी धाव घेत दुचाकीसह जखमी रोडच्या खाली गेले असता त्यांना वर काढून जखमींना येथील खासगी रुग्णालयात पाठवले.