घनसावंगी : जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे महसूल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी संगनमताने व्हीके नंबरच्या माध्यमातून परस्पर लाटल्याप्रकरणी घनसावंगी तहसील कार्यलयावर गुरूवारी आंदोलन करण्यात आले.

अजय गाढे / घनसावंगी : जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे महसूल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी संगनमताने व्हीके नंबरच्या माध्यमातून परस्पर लाटल्याप्रकरणी घनसावंगी तहसील कार्यलयावर गुरूवारी आंदोलन करण्यात आले.
यावेळी युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने भिक मागो आंदोलन करून जमा झालेली भिक तहसीलदार यांच्या रिकाम्या खुर्चीला देण्यात आली. संबंधित घोटाळ्यासाठी नेमलेल्या त्रीसदस्य समिती मार्फत तातडीने चौकशी करून दोषीवर बडतर्फ करण्याची कार्यवाही करावी, असे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत तहसीलदार यांना देण्यात आले आहे. अनुदानापासून वंचित असलेल्या खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना व्हीके नंबर मिळून तात्काळ त्यांचे अनुदान देण्यात यावे, नसता आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत, असा ईशारा संघर्ष समितीच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे.
दरम्यान, बाजारपेठेत भिक मागून आणलेली रक्कम तहसीलदार यांच्या रिकाम्या खुर्चीला देऊन नंतर नायब तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी घनसावंगी तालुक्यातील शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी होते.